Advertisement

दहिसरमध्ये वन विभागाची तोडक कारवाई


दहिसरमध्ये वन विभागाची तोडक कारवाई
SHARES

दहीसर - धारखाडी येथील 4 अनधिकृत दुकानांवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हातोडा मारला. गुरुवारी सकाळी वनविभागाकडून ही तोडक कारवाई करण्यात आली. वनविभागाने पोलीस बंदोबस्तात या दुकानांवर बुलडोजर चालवला. विशेष म्हणजे दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच वनविभागाने ही कारवाई केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान सुप्रीम कोर्टाने 1994 पासून जे इथे राहतात त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.

मात्र तरी देखील ही कारवाई केल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे सांगितले. तर वनविभाग अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement