Advertisement

मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांचं निधन


मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांचं निधन
SHARES

मुंबईचे माजी नगरपाल (शेरीफ) ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा (८६) यांचं रविवारी सकाळी चर्चगेट येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. भाजपा प्रवक्त्या आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर शायना एनसी यांचे वडील होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या एका सच्च्या दिलाच्या मुंबईकराला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

समाजकार्यात भरीव योगदान

मुंबईचं महापौरपद भूषवणाऱ्या चुडासामा यांनी 'जायंट इंटरनॅशनल, 'मुंबई माझी लाडकी', 'फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स', 'नॅशनल किडनी फाऊंडेशन', 'कॉमन मेन्स फोरम' इ. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून मुंबईच्या जडणघडणीत आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. समाजकार्यासाठी स्वत: ला वाहून घेणाऱ्या चुडासामा यांना २००५ 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

मरिन ड्राइव्हवरील त्यांचे देश-विदेशातील विविध घटनांवर नेमक्या शब्दांत टीका-टिपण्णी करणारे बॅनर मुंबईकरांसाठी लक्षवेधी ठरायचे.

सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा