Advertisement

अबब! डेंग्यूच्या उपचारांचं बिल २१ लाख, मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाचा प्रताप


अबब! डेंग्यूच्या उपचारांचं बिल २१ लाख, मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाचा प्रताप
SHARES

मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात डेंग्यूचा एक रुग्ण दाखल झाला. त्या रुग्णाची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला तब्बल १८ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात अालं. मात्र जेव्हा बिल द्यायची वेळ अाली, तेव्हा त्याच्या कुटुंबियांना मात्र मोठा धक्काच बसला. त्यांच्या पायाखालची जमीन जणू सरकली होती. तब्बल २१ लाख रुपयांचं बिल या रुग्णाच्या कुटुंबाकडून घेतल्याचा प्रकार उघड झाला अाहे.


शिवसेनेच्या अामदारांनी केली पोलखोल

शिवसेनेच्या काही अामदार अाणि कार्यकर्त्यांनी हा सर्व प्रकार समोर अाणत फोर्टीस रुग्णालयाच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली अाहे. फोर्टीस रुग्णालयाने अातापर्यंत कशापद्धतीने गरीब रुग्णांची उपचाराच्या नावाखाली फसवणूक केली, याचा रिपोर्टच संजय माशीलकर यांनी पुराव्यासह फोर्टीस रुग्णालयाच्या व्यवस्थापनासमोर ठेवला अाहे.


रुग्णालयाच्या जीवघेण्या कारभारावर प्रश्न उपस्थित

२७ डिसेंबरला शिवसेनेचे भांडुपचे आमदार अशोक पाटील, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय माशीलकर यांनी थेट मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयाकडे मोर्चा वळवला. रुग्णालयात सुरू असलेल्या जीवघेण्या कारभारावर संजय माशीलकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले अाहेत.


फोर्टीस रुग्णालयाचे हे अाहेत प्रताप -

मृत असलेल्या एका रुग्णाला १൦ दिवस व्हेंटिलेटर लावून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं भासवलं आणि त्याच्या कुटुंबियांना२൦ लाखांचं बिल दिलं. एवढंच नाही तर व्हेंटिलेटवर असणाऱ्या रुग्णाला जेवणाचं बिल देखील लावलं.

लेप्टोस्पायरोसिस झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून २൦ लाखांचं बिल वसूल केलं.

१५ वर्षांच्या एका मुलाचं हृदयप्रत्यारोपण करायचं होतं. अद्याप या रुग्णालयात दाखल असलेल्या मुलाला महिना उलटून गेला तरी हृदय मिळालेलं नाही. अाता तर त्याला हृदय प्रत्यारोपणाची गरजच नसल्याचं डाॅक्टरांकडून सांगण्यात येत अाहे. अातापर्यंत त्याचं बिल ३२ लाख रुपये झाल्याचं सांगण्यात अालं अाहे.

एका रुग्णाला मुलुंडच्या श्रद्धा हॉस्पिटलमधून फोर्टीसमध्ये दाखल करण्यात आलं. पण, पुढच्या २५ मिनिटांतच तो रुग्ण दगावला. या रुग्णाचं ब्लडप्रेशर कमी झालं होतं. म्हणून डॉक्टरांनी ब्लडप्रेशर वाढवण्यासाठी बलूनचा वापर केला. त्याचं बिल ९൦ हजार, स्टेंट टाकणे, बेड चार्जेस असा सर्व खर्च मिळून एकूण ३ लाख ९७ हजार बिल लावलं अाहे.

ठाण्यातील एका महिलेची प्रसूती या रुग्णालयात केली गेली. बाळाला श्वास पुरत नाही म्हणून एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. ५ दिवसांचे ५൦ हजार असं बिल त्यावेळेस त्याच्या आई-वडिलांना सांगण्यात आलं. पण, तात्काळ तेवढे पैसे भरण्यासाठी त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांनी १५ हजार रुपये आधी भरले. मग कुठून तरी जमवाजमव करत २५ हजार भरले. एवढे पैसे भरुनही बाळाला भेटू दिलं नाही. त्यानंतर बाळाचं डेथ सर्टिफिकेट आई-वडिलांच्या हातात दिलं.


या डॉक्टरांना दिवसाला सव्वा कोटींचं टार्गेट असतं. ज्यासाठी हे डॉक्टर रुग्णांना आणि नातेवाईकांना घाबरवतात. अॅडमिट व्हा, असं सांगतात. आणि एकदा रुग्ण दाखल झाला की त्याच्या कुटुंबियांकडून नको तेवढे पैसे उकळतात. २२ डॉक्टर या रुग्णालयात काम करतात. त्यांना मासिक वेतन १൦ ते १५ लाख आहे. त्यामुळे त्यांना दिलेलं टार्गेटदेखील पूर्ण करायचं प्रेशर असतं. माझा हा लढा गरीब रुग्णांसाठी आहे. जोपर्यंत रुग्णालय प्रशासन फसवणूक झालेल्या रुग्णांना पैसे परत करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.
- संजय माशीलकर, शिवसैनिक, साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष


१൦ जानेवारीनंतर तीव्र अांदोलनाचा इशारा


या सर्व प्रकारानंतर रुग्णालयाला शिवसेनेकडून एक पत्र देण्यात आलं आहे. १൦ जानेवारीपर्यंत त्याचं प्रत्युत्तर मिळालं नाही तर शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या सर्व प्रकारात रुग्णालय प्रशासन समिती स्थापन करून निर्णय घेणार आहे. आम्ही सर्व बाबी नीट पडताळून पाहू आणि १൦ जानेवारीपर्यंत निर्णय देऊ, असं फोर्टीस रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजय सेठी यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा -

७८ टक्के मुंबईकरांना बायको, मुलांसाठी सोडायचे आहे धूम्रपान...

...अखेर आराध्याला हृदय मिळाले


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा