Advertisement

घाटकोपरमध्ये लिफ्ट खाली कोसळून ४ जखमी

घाटकोपरच्या रमाबाईनगर येथे शांतीसागर पोलिस हाऊसिंग सोसायटी असून या सात मजली इमारतीची लिफ्ट सोमवारी रात्री आठच्या सुमारास अचाकन खाली कोसळली. या लिफ्टची वायर तुटल्याने ही लिफ्ट खाली कोसळली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान लिफ्टमध्ये असलेले ४ जण जखमी झाले आहे.

घाटकोपरमध्ये लिफ्ट खाली कोसळून ४ जखमी
SHARES

घाटकोपर (पूर्व) येथील शांतीसागर पोलिस हाऊसिंग सोसायटीतील इमारतीची लिफ्ट अचानक खाली आपटल्याने ४ जण जखमी झाले आहेत. यासर्वांना राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या यांची प्रकृती स्थिर असल्याचं राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.


लिफ्टची वायर तुटल्याने कोसळली

घाटकोपरच्या रमाबाईनगर येथे शांतीसागर पोलिस हाऊसिंग सोसायटी असून या सात मजली इमारतीची लिफ्ट सोमवारी रात्री आठच्या सुमारास अचाकन खाली कोसळली.

या लिफ्टची वायर तुटल्याने ही लिफ्ट खाली कोसळली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान लिफ्टमध्ये असलेले ४ जण जखमी झाले आहे. रुपाली गायकवाड (२३), सुनिता इंगळे (२८), कोमल दळवी (१८) आणि विनायक दळवी (४३) अशी या चार जणांची नावं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं राजावाडी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा