Advertisement

बदलापूर : कोंडेश्वरमध्ये 4 अल्पवयीन मुलं बुडाली, मुंबईहून पिकनिकसाठी आले होते

बदलापूरजवळच्या कोंडेश्वरमध्ये चार अल्पवयीन मुलं बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

बदलापूर : कोंडेश्वरमध्ये 4 अल्पवयीन मुलं बुडाली, मुंबईहून पिकनिकसाठी आले होते
SHARES

बदलापूरजवळच्या कोंडेश्वरमध्ये चार अल्पवयीन मुलं बुडाल्याची माहिती समोर आली आहे. कोंडेश्वर मंदिराच्या मागे धबधब्याच्या कुंडात चारही मुलं बुडाली आहेत.

चौघेही घाटकोपरहून पिकनिकसाठी कोंडेश्वरला आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चौघांचे मृतदेह बाहेर काढले असून रुग्णालयात पाठवले आहेत. मुलांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या आकाश राजू झिंगा या 19 वर्षीय तरुणाचा आज वाढदिवस होता. त्यासाठी तो त्याच्या सहा ते सात मित्रांसोबत बदलापूरच्या कोंडेश्वर परिसरात आला होता. यावेळी आकाश याच्यासह स्वयम बाबा मांजरेकर (वय 18), सुरज मच्छिन्द्र साळवे (वय 19) आणि लिनस भास्कर उच्चपवार (वय 19) असे चौघे कोंडेश्वरच्या धबधब्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्यानं या चौघांचाही बुडून मृत्यू झाला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी या चौघांना पाण्याच्या बाहेर काढलं. तर पोलिसांनी पंचनामा करत त्यांचे मृतदेह बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

कोंडेश्वर धबधब्याच्या खाली अनेक वर्षांपासून पाणी पडल्यानं कुंड तयार झाले असून तिथे आजवर अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या धबधब्याच्या परिसरात जायलाही प्रशासनानं काही वर्षांपासून सक्त मनाई केलेली आहे. मात्र तरीही बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ही बाब माहीत नसल्यानं अनेकांचे याठिकाणी जीव जातायत.हेही वाचा

मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू, 'हे' आहेत निर्बंध

दुधाचे दर पुन्हा वाढू शकतात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा