Advertisement

मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू, 'हे' आहेत निर्बंध

महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांमध्ये कलम 144 लादण्याचाही समावेश आहे. भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 144 सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करते.

मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू, 'हे' आहेत निर्बंध
SHARES

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 1 नोव्हेबंर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई पोलिस त्यांच्यावर कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत.

मुंबई पोलिसांचे डीसीपी ऑपरेशन संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.

मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबईतील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळाली आहे. याशिवाय मानवी जीवित व मालमत्तेचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे मुंबईत दंगल घडू नये आणि सार्वजनिक वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पाच किंवा अधिक व्यक्तीच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीची मिरवणूक काढता येणार नाही. कोणत्याही मिरवणुकीत लाउडस्पीकर, वाद्य आणि फटाके फोडण्यास मनाई असेल.

सर्व प्रकारचे विवाह समारंभ, अंत्यसंस्कार सभा, स्मशानभूमी, दफन स्थळांच्या मार्गावरील मिरवणूक यांना यातून सूट देण्यात आली आहे. तसेच कंपन्या, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका यांनाही यातून सूट देण्यात आली आहे.हेही वाचा

खुशखबर! दिवाळीनिमित्त डाळीच्या दरात घट, आता 'इतकी' आहे किंमत

पालिकेच्या निवडणुका पुन्हा ६ महिन्यांसाठी पुढे ढकलल्या जाऊ शकतात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा