Advertisement

मेनहोलमध्ये पडून ४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, पोलिसांनी पालिकेकडून मागितली माहिती

उड्डाण पुलाखाली शौचालयाच्या टाकीचं झाकण उघडं असल्यामुळे एका चार वर्षीय मुलीचा पडून मृत्यू झाला आहे.

मेनहोलमध्ये पडून ४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, पोलिसांनी पालिकेकडून मागितली माहिती
SHARES

उड्डाण पुलाखाली शौचालयाच्या टाकीचं झाकण उघडं असल्यामुळे एका चार वर्षीय मुलीचा पडून मृत्यू झाला आहे. अफिफा मुस्तफा अली अन्सारी असं या मृत चिमुकलीचे नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या मुलीच्या मृत्यूच्या जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.

मुलीचे वडील मुस्तफा अली यांनी सांगितलं की, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ते आफिफाला घेऊन आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. तिथे शेजारच्या मुलांसोबत ती खेळायला गेली होती. तेव्हाच फ्लाय ओव्हर खाली गेली आणि तिथे उघड्या गटरच्या मेन होलमध्ये पडली.

काशी मीरा पोलिसांनी केस दाखल केली आहे. यासोबतच घटनेसाठी जबाबदार व्यक्तीची माहिती काढण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेला माहिती मागितली आहे. तपासा समोर आलं की, महापालिकेच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी मेनहोलचे झाकण काढण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी जाळी लावण्याचं काम केलं जाणार होतं.

यापूर्वी गोरेगांवच्या परिसरात पावसाच्या वेळी नाल्यामध्ये वाहून गेल्यानं दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह दोन दिवसांनंतर दूर नाल्यात सापडला होता.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा