Advertisement

'या' तारखेपासून शिवभोजन थाळीचं मोफत वितरण बंद

तसं परिपत्रकच राज्य सरकारकडून जारी करण्यात आलं आहे.

'या' तारखेपासून शिवभोजन थाळीचं मोफत वितरण बंद
SHARES

कोरोना निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसं परिपत्रकच राज्य सरकारकडून जारी करण्यात आलं आहे.

कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सतावू लागला होता. त्यामुळे गरजू लोकांसाठी राज्य सरकारनं शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. मागील काही महिन्यांपासून गरजू लोक या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेत होते.

राज्य सरकारनं मोफत शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता शिवभोजन थाळीसाठी १ ऑक्टोबरपासून १० रुपये मोजावे लागणार आहेत. तशी माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिलीय.

राज्य सरकारनं पहिल्यांना १४ मे २०२१, पुढे १७ जून २०२१ आणि ३० जून २०२१ अशी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता १४ सप्टेंबर रोजीही एकदा मुदतवाढ देण्यात आली होती.

राज्यातील ब्रेक द चेन अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केलं होतं. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.

शिवभोजन थाळी केंद्र चालकांना सरकारकडून थाळीमागे प्रत्येकी ४० रुपये अनुदान मिळते. तर १० रुपये ग्राहकाकडून मिळतात. हे अनुदान पुरवठा विभागाकडून केंद्र चालकाच्या बँक खात्यात दर १५ दिवसांनी जमा केले जातात, असंही ढोले यांनी यावेळी सांगितलं.

आता ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी मोफत सुविधा देखील बंद केली जाणार आहे. १ ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी १० रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर पार्सल देखील ऑक्टोबर महिन्यापासून बंद केलं जाणार आहे.हेही वाचा

मुंबई महापालिका नद्यांच्या सफाईसाठी तब्बल १,३०० कोटी खर्च करणार

बेस्टच्या महिला प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुरक्षित होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा