Advertisement

बेस्टच्या महिला प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुरक्षित होणार

बेस्टनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्ट उफक्रमानं पुढाकार घेतला आहे.

बेस्टच्या महिला प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुरक्षित होणार
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्ट उफक्रमानं पुढाकार घेतला आहे. बेस्ट उपक्रमाकडून आणल्या जाणाऱ्या नव्या मोबाइल तिकीट अ‍ॅपमध्ये महिला प्रवाशांच्याही सुरक्षेवरही भर देण्यात आला आहे. आपत्कालिन परिस्थितीत अ‍ॅपमधील बटण दाबताच त्याची माहिती बेस्टसह पोलीस नियंत्रण कक्षाला मिळून संबंधित महिला प्रवाशांना तात्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे.

बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे प्रमाण पाहता येत्या काही महिन्यांत त्यांच्यासाठी बसगाड्या व फेऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळते. येत्या डिसेंबर २०२१ पर्यंत नवीन मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा प्रवाशांसाठी आणण्याचे उद्दिष्ट आहे. तिकीट, पास सुविधा देतानाच अ‍ॅपमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आल्याची माहिती मिळते.

  • या सुविधेत प्रवाशांना घरबसल्या तिकीट, पास काढता येईल व प्रवासाच्या वेळी ते वाहकाला दाखवावे लागेल.
  • धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा कार्यरत असेल.
  • अ‍ॅपमधील अलार्म बटण दाबताच त्याची माहिती तात्काळ बेस्ट आणि पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळू शकेल.
  • बसची सद्य:स्थिती समजणारी यंत्रणा अ‍ॅपमध्ये देतानाच बसगाड्यांमध्येही असल्यानं बेस्ट कर्मचारी व पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचतील.
  • रात्री किंवा पहाटेच्या सुमारास प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना यामुळेही आणखी सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल.

बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये महिला प्रवाशांचेही प्रमाण अधिकच असते. त्यांच्यासाठी महिला विशेष बस फेऱ्या चालवताना तेजस्विनी बसगाडय़ाही चालवण्यात येतात. त्यात वाढ करण्याचे नियोजन उपक्रमाने केले आहे. येत्या काही महिन्यांत आणखी काही बसगाड्या सेवेत येतील. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी महिला बस फेऱ्या वाढवण्यात येणार असून यात तेजस्विनी बसचीही भर पडणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा