Advertisement

दादरमध्ये प्राणिक उपचारावर मोफत सेमिनार


दादरमध्ये प्राणिक उपचारावर मोफत सेमिनार
SHARES

प्राणशक्तीचा व्यक्त अनुभव देणाऱ्या 'प्राणिक हिलिंग' अर्थात प्राणिक उपचारपद्धतीवर २ तासांच्या विनामूल्य शिबिराचं रविवारी दादरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराच्या माध्यमातून उपस्थितांना स्पर्शविरहित प्राणिक उपचारपद्धतीचा लाभ घेता येईल.


काय आहे प्राणिक उपचार?

प्राणिक उपचाराअंतर्गत दैनंदिन जीवनात ध्यान करण्याची आवश्यकता लक्षात येऊ शकेल. द्विहृदयी ध्यानामुळे मानसिक स्वाथ्य सुधारता येऊ शकेल. डाॅक्टर, नर्स, मजासतज्ज्ञ, अॅक्युपंक्चर, शरीररचनातज्ज्ञ यांसारख्या तज्ज्ञांना प्राणिक उपचार पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं.


या उपचारपद्धतीमुळे अनेक उपचारतज्ज्ञ अत्यंत कमी वेळात सहजरीत्या, आत्मविश्वासाने उपचार करत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. १६ वर्षांवरील कुठल्याही साक्षर व्यक्तीला यासंदर्भात प्रशिक्षण घेता येईल.


कुठे होणार आयोजन?

प्राणिक उपचार प्रशिक्षण शिबीर रविवार २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १०.३०, १०.३० ते १२.००, १२.३० ते २.०० आणि २.३० ते ४.०० या वेळेत वीर सावरकर (मॅडम कामा), शिवाजी पार्कसमोर, दादर (प) इथं होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा