Advertisement

रमजान असूनही 'निपाह'च्या भीतीने घटली फळांची आवक

'निपाह' व्हायरसने महाराष्ट्रात शिरकाव करू नये, म्हणून चोख उपाययोजना केल्याचं आश्वासन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी नुकतंच दिलं. राज्यात 'निपाह'चा धोका नसला, तरी त्यांनी सगळ्यांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. सर्वसामान्यही आपापल्या परीने दक्षता घेत आहेत. याचाच परिणाम की काय रमजान महिन्यात दुप्पट फळविक्री होणं अपेक्षित असताना चक्क फळविक्री निम्म्याने घटली आहे.

रमजान असूनही 'निपाह'च्या भीतीने घटली फळांची आवक
SHARES

केरळमध्ये 'निपाह' व्हायरसने १० जणांचा बळी घेतल्यामुळे देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हा व्हायरस वटवाघळांनी खाल्लेल्या फळ-फुलांच्या माध्यमातून (लाळेतून) मनुष्यवस्तीत पसरत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं असल्याने सर्वसामान्यांनी फळांचा चांगलाच धसका घेतल्याचं दिसून येत आहे. सध्या मुस्लिम बांधवांचा 'रमझान'चा महिना सुरू असूनही फळांची मागणी घटल्याने व्यापारी आणि फळ विक्रेते चिंतेत आले आहेत.



फळविक्री निम्म्याने घटली

'निपाह' व्हायरसने महाराष्ट्रात शिरकाव करू नये, म्हणून चोख उपाययोजना केल्याचं आश्वासन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी नुकतंच दिलं. राज्यात 'निपाह'चा धोका नसला, तरी त्यांनी सगळ्यांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. सर्वसामान्यही आपापल्या परीने दक्षता घेत आहेत. याचाच परिणाम की काय रमजान महिन्यात दुप्पट फळविक्री होणं अपेक्षित असताना चक्क फळविक्री निम्म्याने घटली आहे.



चाचणी करूनच फळविक्री

''नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी मार्केट ) ही मुंबईतील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून इथं फळे, भाजीपाला, सुका मेवा आणि इतर अन्नधान्याचा पुरवठा होतो. या बाजारपेठेत जिथं दररोज ४०० ते ५०० ट्रक भरून फळ येत होते, तिथं दिवसाला केवळ २०० ते २५० ट्रक फळांची आवक हाेत आहे. हा पूर्णपणे मागणी घटल्याचा परिणाम आहे'', असं संजय पिंपळे, सेक्रेटरी, फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशन एपीएमसी मार्केट, वाशी यांनी सांगितलं.

'निपाह'मुळे सर्वसामान्यांना धोका होऊ नये म्हणून दक्षिण भारतातून येणाऱ्या फळांची चाचणी करूनच त्यांची विक्री करत असल्याची माहितीही पिंपळे यांनी दिली.


सुक्यामेव्याला प्राधान्य

सध्या रमझानचा महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधव फळे आणि खजूर खाऊन उपवास सोडतात. त्यामुळे या महिन्यांत फळे आणि खजुरांना मोठी मागणी असते. परंतु 'निपाह' व्हायरसच्या धोक्यामुळे उपवास करणारे मुस्लिम बांधव फळांना टाळून सुका मेवा आणि खुजराला प्राधान्य देत असल्याचंही दिसून येत आहे.



सोशल मीडियात 'निपाह'वर बरीच चर्चा सुरू असल्याने आम्ही फळे आणि खजूर खाऊन उपवास सोडण्याचं टाळत आहोत. त्याऐवजी आम्ही कडधान्ये आणि पालेभाज्या खाण्याला प्राधान्य देत आहोत.
- इक्बाल मिर्झा



दक्षिण भारतातील फळे टाळा

दिवसभर उपाशी राहिल्यानंतर संध्याकाळी फळे खाल्ल्यास फळांच्या माध्यमातून शरीरातील कमी झालेली ऊर्जा परत मिळण्यास मदत होते. खजूरात देखील पोषक तत्वाचं मोठं भंडार असल्याने या काळात खजूर खाण्याला प्राधान्य देण्यात येतं. मुंबईच्या बाजारात देशभरातून फळे आणि खजूर येत असतात. 'निपाह' व्हायरचा धोका होऊ नये म्हणून दक्षिण भारतातून येणारी फळे आणि खजूर घेण्याचं टाळावं, असा सल्ला यानिमित्ताने अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे उपाध्यक्ष (महाराष्ट्र) सलीम शेख यांनी दिला.



हेही वाचा-

निपाह व्हायरसमुळे मुंबईसह पुण्यात अलर्ट

'निपाह' व्हायरस अलर्ट: कस्तुरबा रुग्णालयात विशेष वाॅर्ड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा