Advertisement

पेट्रोल-डिझेलचा भडका कायम

सोमवारी इंधनाच्या दराने मुंबईत उच्चांक गाठला. एक लिटर पेट्रोलचे दर ८६.५६ रुपये आणि डिझेल ७५. ५४ रुपयांनी महागले आहे. आठवड्याभरातली ही चौथी इंधन दरवाढ आहे. मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्येही इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचा भडका कायम
SHARES

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पुन्हा भडका उडाला आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ३१ पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे ४४ पैशांनी महागले आहे. रुपयाची होत असलेली घसरण आणि इंधन दरवाढीमुळे महागाईत आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत.

इतक्या रुपयांनी महाग

सोमवारी इंधनाच्या दराने मुंबईत उच्चांक गाठला. एक लिटर पेट्रोलचे दर ८६.५६ रुपये आणि डिझेल ७५. ५४ रुपयांनी महागले आहे. आठवड्याभरातली ही चौथी इंधन दरवाढ आहे. मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्येही इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.

मुंबईत इंधनाचे दर जास्त

मुंबईत पेट्रोलवरील व्हॅट सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ (व्हॅट) घेतला जातो. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत इंधनाचे दर जास्त आहेत. दिल्लीत पेट्रोलवर २७ टक्के आणि डिझेलवर १७.२४ टक्के व्हॅट घेतला जातो. याआधी मुंबईत २९ मे रोजी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८६.२४ इतका झाला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा