Advertisement

मुंबईत पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं


मुंबईत पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं
SHARES

केंद्र सरकारकडून इंधन दरवाढ कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात सतत होणारी घसरण इंधन दरवाढीस कारणीभूत ठरली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 70.80 पर्यंत पोहचला आहे.


म्हणून इंधन दरवाढ

मुंबईत पेट्रोलचे 13 पैशांनी वाढले असून 85.60 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डीझेल 15 पैशांनी महागले असून ग्राहकांना प्रति लिटरसाठी 74.04 रुपये मोजावे लागणार आहेत. डॉलरसमोर रुपया कमकुवत ठरत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरवाढीत सातत्याने वाढ होत आहे. 29 मे 2018 पासून इंधन दरात सतत वाढ सुरू आहे. महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1.40 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे.

मागच्या आठवड्यात क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर झाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा