Advertisement

डाॅलरच्या तुलनेत रुपयाचा विक्रमी नीचांक; ७०.५२ रुपये एका डाॅलरची किंमत

देशात खाण्या-पिण्याच्या वस्तू अाणि इतर गरजेच्या सामानांची वाहतूक करण्यासाठी डिझेल वाहनांचा वापर होतो. डिझेल महागल्यास या सर्व वस्तूंचे भाव वाढतील. तसंच खाद्यतेलही महाग होईल.

डाॅलरच्या तुलनेत रुपयाचा विक्रमी नीचांक; ७०.५२ रुपये एका डाॅलरची किंमत
SHARES

डाॅलरच्या तुलनेत रुपयामधील घसरण सुरूच अाहे. बुधवारी रुपया ४२ पैसे घसरून ७०.५२ च्या विक्रमी स्तरावर घसरला. प्रथमच रुपयाने डाॅलरच्या तुलनेत इतकी नीचांकी पातळी गाठली अाहे. याअगोदर रुपया १६ अाॅगस्ट रोजी ७०.४० पर्यंत घसरला होता. हा अातापर्यंतचा रुपयाचा नीचांक होता.


विक्री केल्यामुळे घसरण

बुधवारी रुपयाची सुरूवात मोठ्या घसरणीने झाली. डाॅलरच्या तुलनेत रुपया २२ पैशाने घसरून ७०.३२  प्रति डॉलरवर उघडला. मंगळवारी रुपयामध्ये थोडीसी सुधारणा झाली होती. रुपया ६ पैशाने वाढून ७०.१० वर बंद झाला होता. तेल अायातदार अाणि विदेशी बँकांमार्फत सरकारी बँकांकडून विक्री केल्यामुळे रुपया घसरला अाहे.


पेट्रोल-डिझेल महागणार

डाॅलरच्या तुलनेत रुपया ७० च्या वर गेल्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या अायातीवर होणार अाहे. भारत अापल्या गरजेच्या ८० टक्के कच्चे तेल अायात करतो. डाॅलरची किमत वाढल्याने कच्चे तेल अायातीचा खर्चही वाढणार अाहे. त्यामुळे तेल विपणन कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवतील.
 

महागाई वाढू शकते

देशात खाण्या-पिण्याच्या वस्तू अाणि इतर गरजेच्या सामानांची वाहतूक करण्यासाठी डिझेल वाहनांचा वापर होतो. डिझेल महागल्यास या सर्व वस्तूंचे भाव वाढतील. तसंच खाद्यतेलही महाग होईल.
 

या क्षेत्रांना फायदा

रूपयाच्या तुलनेत डाॅलर मजबूत झाल्याने सर्वाधिक फायदा अायटी, औषध अाणि वाहन क्षेत्राला होईल. या कंपन्यांना निर्यातीतून अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे डाॅलरच्या मजबुतीचा फायदा टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या अायटी कंपन्यांसह अमेरिकन बाजारात व्यवसाय करणाऱ्या औषध कंपन्यांनाही होणार अाहे. याशिवाय ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, अाॅईल इंडिया लिमिटेड अादी गॅस उत्पादक कंपन्यांना डाॅलरच्या तेजीचा फायदा मिळेल. या कंपन्या डाॅलरमध्ये तेलाची मोठी विक्री करतात.



हेही वाचा - 

नोटबंदीतील ९९ टक्के नोटा बँकांकडे जमा; अारबीअायची अाकडेवारी

मुंबईत पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा