Advertisement

नोटबंदीतील ९९ टक्के नोटा बँकांकडे जमा; अारबीअायची अाकडेवारी

नोटबंदीत एकूण १५ लाख ४४ हजार कोटी रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. त्यामधील १५ लाख ३१ हजार कोटी रुपयांच्या नोटा अारबीअायकडे जमा झाल्या अाहेत.

नोटबंदीतील ९९ टक्के नोटा बँकांकडे जमा; अारबीअायची अाकडेवारी
SHARES

नोटबंदीमध्ये रद्द केलेल्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडं जमा झाल्या अाहेत. नोटबंदीत एकूण १५ लाख ४४ हजार कोटी रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. त्यामधील १५ लाख ३१ हजार कोटी रुपयांच्या नोटा अारबीअायकडे जमा झाल्या अाहेत. फक्त १३ हजार कोटींच्या नोटाच यंत्रणेतून बाहेर गेल्या अाहेत. अारबीअायने जाहीर केलेल्या अाकडेवारीतून ही माहिती समोर अाली अाहे.


७९६५ कोटी खर्च

अारबीअायने यासंदर्भात म्हटलं की, नोटबंदीची प्रक्रिया मोठी अाव्हानात्मक अाणि कठीण होती. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर नवीन  नोटा छापण्यात अाल्या.  नवीन नोटा छापण्यासाठी सरकारला अातापर्यंत ७९६५ कोटी रुपये खर्च अाला अाहे.


१४० लोकांचा मृत्यू

पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटबंदीची घोषणा केली होती. मोदी यांनी ५०० अाणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची माहिती दिली. यावेळी जुन्या नोटा बदलण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात अाला होता. नोटबंदीमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांचे मोठे हालही झाले होते. बँकांच्या रांगामध्ये उभे राहिल्याने तब्बल १४० लोकांचा मृत्यूही झाला होता. हेही वाचा -

मुंबईत पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

बिल्डरांना टायटल इन्शुरन्स बंधनकारक होणार?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा