बिंबीसारच्या गणेश मैदानाची दुरवस्था

 Goregaon
बिंबीसारच्या गणेश मैदानाची दुरवस्था
बिंबीसारच्या गणेश मैदानाची दुरवस्था
बिंबीसारच्या गणेश मैदानाची दुरवस्था
बिंबीसारच्या गणेश मैदानाची दुरवस्था
बिंबीसारच्या गणेश मैदानाची दुरवस्था
See all

गोरेगाव - गेले कित्येक महिन्यापासून गोरेगाव पूर्वेच्या बिंबीसारनगरमधील गणेश मैदानाची दुरवस्था झाली आहे. हे मैदान म्हाडाच्या हद्दीत येत असल्यामुळे पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे.

बिबींसारनगरमध्ये ३० इमारती आहेत आणि मुलांसाठी खेळण्याचे हे एकमेव मैदान आहे. मैदानात आमदार निधीतून शैाचालय, पाणपोई, झाडे, मुलांसाठी लागणारे खेळण्याचे साहित्य लावण्यात आली मात्र काही महिन्यातच त्यांची दरवस्था झाली आहे. तसंच पाणपोईचे पाणी. शौचालयाचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. मैदानाचे लोखंडी दरवाजे तुटल्याने रात्रीच्या वेळेस येथे गर्दुल्ले वास्तवाला असतात. त्यामुळे लहान मुलांनी खेळायला जायचं कुठा असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केलाय.

तर हे म्हाडाच्या हद्दीतील मैदान असून जेव्हा ते मैदान पालिकेकडे येईल त्यावेळी त्याचे सुशोभिकरण पालिका नक्कीच करेल असं पालिका विभागातील अधिकारी सचिन पारकर यांनी सांगितलं.

Loading Comments