Advertisement

गणेशोत्सव २०१९: कृत्रित तलावांत गणेश विसर्जनाचं प्रमाण वाढणार का?


गणेशोत्सव २०१९: कृत्रित तलावांत गणेश विसर्जनाचं प्रमाण वाढणार का?
SHARES

मुंबईतील गणेशोत्सवाची धामधूम दरवर्षी वाढतच चालली आहे. त्यानुसार घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होणाऱ्या गणेशमूर्तींच्या संख्येतही भर पडत आहे. गणरायाला निरोप देताना भाविकांनी नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये मूर्तींचं विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचं विसर्जन करावं, पर्यावरण रक्षणात हातभार लावावा यासाठी मुंबई महापालिकेकडून दरवर्षी शहरांत ठिकठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात येतात. त्याप्रमाणे यंदाही महापालिकेने शहरातील ३२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

६५० मंडळांची भर

राज्यात खासकरून मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईत अंदाजे १० हजारांहून अधिक सार्वजनिक आणि दीड लाखांहून अधिक ठिकाणी घरगुती गणपतीची स्थापना करण्यात येते. मुंबईत यंदा ६५० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची भर पडल्याने हा आकडा १४ हजारांच्या पलिकडे गेला आहे.

गणेशमूर्ती बनवताना किंवा खरेदी करताना भाविकांकडून शाडू मातीऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींनांच प्राधान्य देण्यात येतं. या मूर्ती रंगवताना काही ठिकाणी विषारी रंगांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक स्त्रोतांमध्ये (समुद्र, तलाव) केल्यास मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होतं. त्यातील जलचरांच्या अस्तित्वाला धोका पोहोचतो. शिवाय या मूर्तीचं लवकर विघटन होत नसल्याने या मूर्तींच्या विसर्जनासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. 

कृत्रिम तलावांत विसर्जीत झालेल्या मूर्तींचा आकडा:

वर्षघरगुती सार्वजनिकएकूण
२०१५१०, ९५७३९१०,९९६
२०१६१३,७६६१५५१३,९२१
२०१७१२, ९९९१४४१३,११३
२०१८३२,९५९+७८२ गौरी८४३३४,५८४

अत्यल्प प्रतिसाद

त्यामुळे मागील १२ वर्षांपासून महापालिकेने शहरात गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याची सुरूवात केली. २००७ मध्ये तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांनी महापौर बंगल्यासहित शहरभरात कृत्रिम तलाव बांधून त्यात मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन केलं होतं. सार्वजनिक गणेशमूर्तींची उंची जास्त असल्याने या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसला, तर घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याकडे भाविकांचा कल वाढू लागला आहे.

तर ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर २०१८ मध्ये १३,३४७ सार्वजनिक २,२२,०२६ घरगुती अशा एकूण २,३५,३७३ गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे यंदा दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि ११ व्या दिवशी कृत्रिम तलावांमध्ये होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाचं प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा आहे.

काही निवडक कृत्रिम तलावांची ठिकाणं:                 

वाॅर्ड

कृत्रिम तलावांचं ठिकाण

एफ-दक्षिण

स्वान मिल मनोरंजन मैदान 

एफ-उत्तर

अशोक पिसाळ मैदान, प्रतिक्षा नगर 

जी-दक्षिण 

खेडस्कर गली

जी-उत्तर

महापौर बंगला

एच- पूर्व

महात्मा गांधी विद्यालय

एच-पश्चिम

संभाजी गार्डन, गजधर पार्क

 

के-पूर्व

डाॅ. हेडगेवार मैदान 

के-पश्चिम

लोखंडवाला काॅम्प्लेक्स

एन

डाॅ. बळीराम हेडगेवार मैदान, दत्ताजी साळवी मैदान

पी-दक्षिण

पांडुरंगवाडी, गोरेगाव पूर्व

गणेश घाट

पी-उत्तर

रामलीला मैदान,

बुवा साळवी मैदान

देसाई तलाव

आर-दक्षिण

आकृती म्युनिसिपल चौकी 

ठाकूर व्हिलेज

लोखंडवाला तलाव

आर-उत्तर

दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन

अशोकवन म्युनिसिपल मैदान

तावडेवाडी, दहिसर पूर्व

आर-मध्य

अनंतराव भोसले क्रीडांगण 

पी.जी. प्लाॅट कुलुपवाडी 

स्वप्न नगरी तलाव



हेही वाचा-

'या' नेत्यांच्या घरी आले बाप्पा

गणेशोत्सव २०१९ : यावर्षी मुंबईतल्या या '७' गणपती मंदिरांना भेट द्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा