'या' नेत्यांच्या घरी आले बाप्पा


SHARE

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गणरायाची सहकुटुंब पूजा करून महाराष्ट्रातील तमाम भाविकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच राज्यावर येणाऱ्या सर्व संकटाशी मुकाबला करण्याची शक्ती सर्वांना मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 

सोबतच मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राज्यातील सर्वच  मंत्र्यांच्या बंगल्यांना विशेष सजावट करण्यात आली आहे. हार-पुष्प, रोषणाईने सगळे बंगले सजवण्यात आले आहेत. पुढील १० दिवस गणेशोत्सवाची धामधुम पूर्ण राज्यात बघायला मिळणार आहे.

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. सोबतच आपल्या वांद्रे मंडळातील गणपतीची पूजा केली.

उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या सेवा सदन बंगल्यावरही गणरायाचं आगमन झालं असून त्यांनी ट्विटरवरून पर्यावरणाला हानी न पोहचवता गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणेशाची मनोभावे पूजा केली. तसंच बळीराजाच्या भल्यासाठी प्रार्थना केली.

काँग्रेस नेते आणि माजी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: गणरायाचं उत्साहात आगमन, मुंबईत कडेकोट बंदोबस्त

अमित शहा यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शनसंबंधित विषय
ताज्या बातम्या