अमित शहा यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी सकाळी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. दुपारच्या सुमारास ते मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.

  • अमित शहा यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
SHARE

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी सकाळी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी सोलापूर इथं अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर शहा मुंबईत दाखल झाले. 

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षणमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी शहा यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. 


सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर शहा राजभवनकडे रवाना झाले. दुपारच्या सुमारास ते मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. 

दरम्यान रविवारच्या कार्यक्रमात शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाने अजून आपले दरवाजे पूर्णपणे उघडलेले नाहीत. हे दरवाजे पूर्ण उघडल्यास विरोधी पक्षांत शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कुणीही उरणार नाही,  असं ते म्हणाले. 


हेही वाचा-

भाजपाने दरवाजे उघडल्यास विरोधकांमध्ये पवारांशिवाय कुणीही उरणार नाही- शहा

अन् शरद पवार भडकले, पत्रकार परिषद सोडून चालू लागलेसंबंधित विषय
ताज्या बातम्या