Advertisement

मुलुंडमध्ये पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी

मुलुंड मधील प्रसिध्द गणेश मूर्तीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यावर्षी देखील पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी साकारली आहे.

मुलुंडमध्ये पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी
SHARES

भारतीय संस्कृतीत रांगोळीला विशेष महत्त्व आहे. सणावाराला रांगोळीची सजावट विशेष लक्षवेधी आणि मोहक असते. गणेशोत्सवात (ganesh festival) विविध रंगाच्या, आकाराच्या आणि शैलीच्या रांगोळ्या जनमानसाचे लक्ष वेधून घेत असतात.

मुलुंड (mulund) मधील प्रसिध्द गणेश मूर्तीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यावर्षी देखील पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी (rangoli) साकारली आहे. पाच फूट रुंद आणि सहा फूट लांब अशी ही रांगोळी असून 14 सप्टेंबरपासून ती नागरिकांना पाहता येणार आहे.

दोडेचा यांनी 1961 पासून आशा प्रकारच्या रांगोळ्या तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी तयार केलेली रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नागरिक येतात. त्यांनी साकारलेल्या रांगोळ्या विशेष लक्षवेधी असतात.

या सागो रांगोळीची आंतरराष्ट्रीय गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. यावर्षी देखील त्यांनी पाच फूट रुंद आणि सहा फुट लांब अशी ही रांगोळी तयार केली असून 35 किलो साबुदाणे वापरले आहेत.

महिन्याभरापूर्वी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या रांगोळीला सुरुवात केली असून रोज 12 ते 15 तास ते या रंगोळीवर काम करत आहेत. सध्या या रांगोळीचे काम अंतिम टप्यात आहे. 14 सप्टेंबर 2024 पासून 22 सप्टेंबर 2024 पर्यंत ही रांगोळी मुलुंडच्या आझाद भवन येथे पाहता येणार आहे.



हेही वाचा

पनवेल-मडगाव दरम्यान दोन अतिरिक्त विशेष रेल्वे धावणार

मुंबईतील डब्बेवाल्यांचा प्रवास आता केरळमधील शालेय पुस्तकात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा