Advertisement

गरबा कार्यक्रमावर पोलिसांची धाड, गुन्हा दाखल

यातल्या कुणीच मास्क घातले नव्हते किंवा सामाजिक अंतराच्या नियमांचं देखील पालन केलं नव्हतं.

गरबा कार्यक्रमावर पोलिसांची धाड, गुन्हा दाखल
फाईल फोटो
SHARES

सांताक्रूझ पोलिसांनी नवरात्रीच्या निमित्तानं आयोजित गरबा पार्टीचा कार्यक्रमावर धाड टाकली. सांताक्रूझ (प) इथल्या एका हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी १०० लोकांचा जमाव जमला होता. यातल्या कुणीच मास्क घातले नव्हते किंवा सामाजिक अंतराच्या नियमांचं देखील पालन केलं नव्हतं.

खात्यांनुसार, सांताक्रूझ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक, ज्ञानेश्वर गणोरे पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या व्हॅननं एसएनडीटी महाविद्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक कार पाहिल्या. चौकशीनंतर कळालं की कॉलेजच्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये गरबा सुरू असल्याचं कळालं. त्यानंतर ते तिकडे पोडोचले तर तिथं प्रचंड गर्दी आढळून आली.

भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम १८८, २६९ आणि ३४ तसंच आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या इतर श्रेणींमध्ये हॉलचे मालक, आयोजकांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.

कोरोनामुळं निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता काही गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत खालील नियम लागू करण्यात आले होते. पण हे प्रकरण पाहता नागरिकांनी पुन्हा एकदा याची आठवण करून देण्याची गरज आहे.

  • महापालिका तसंच संबंधित स्थानिक प्रशासनाचं मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
  • यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगानं करण्यात यावी.
  • देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटांच्या मर्यादेत असावी.
  • मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे.
  • मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.
  • विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
  • गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत.
  • त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
  • देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही.
  • ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे.
  • मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी.
  • मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल.
  • देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
  • लहान मुले आणि वरिष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे.
  • संपूर्ण चाळीतील/ इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.



हेही वाचा

Navratri 2021 : ‘या’ मंदिरांमध्ये घ्या आदिमातेचे दर्शन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा