Advertisement

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आणखी एका जखमीचा मृत्यू

मृतांची संख्या 17 वर गेली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आणखी एका जखमीचा मृत्यू
SHARES

मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातातील जखमींची संख्या 70 हून अधिक आहे. 

या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन केली आहे. एसआयटीमध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर बीएमसीने नवीन होर्डिंगला परवानगी थांबवून नवीन धोरण आखले आहे.

घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली आहे. भिंडे हे मेसर्स इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहेत. पोलिसांनी त्याला राजस्थानच्या उदयपूर येथून अटक केली होती. तो एका हॉटेलमध्ये लपून बसला होता.

हेही वाचा

मुंबईत 24-25 मे रोजी पाणीकपात

ठाणेकरांनो लक्ष द्या! या तारखेला पाणीपुरवठा बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा