Advertisement

राज्यभरात हुडहुडी! गोंदिया ७.४, मुंबई २० अंशांवर

शीत लहरीमुळं उत्तरेकडील राज्यात हाडे गोठविणारी थंडी पडली असतानाच, आता महाराष्ट्रातही गारठा वाढू लागला आहे.

राज्यभरात हुडहुडी! गोंदिया ७.४, मुंबई २० अंशांवर
SHARES

मुंबईसह राज्यात थंडी वाढली आहे. शीत लहरीमुळं उत्तरेकडील राज्यात हाडे गोठविणारी थंडी पडली असतानाच, आता महाराष्ट्रातही गारठा वाढू लागला आहे. मुंबईत रविवारी किमान तापमानाची नोंद २०.२ अंश सेल्सिअस एवढी झाली. सोमवारपासून मुंबईसह लगतच्या परिसरात किमान तापमानात आणखी घट नोंदविण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील गोंदिया इथं रविवारी सर्वात कमी किमान तापमान ७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात घसरलेल्या किमान तापमानामुळं येथील जिल्ह्यात गारठा वाढला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. सोमवारपासून मुंबईसह लगतच्या परिसरात किमान तापमानात आणखी घट नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा