आरोग्य सेविकांसाठी खुशखबर

 Mumbai
आरोग्य सेविकांसाठी खुशखबर

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रातील चार हजार आरोग्य सेविकांसाठी खुशखबर आहे. आरोग्य सेविकांना प्रोव्हिडन्ट फंड, पेन्शन आणि विमा लागू करण्यात आलाय. पालिकेनं त्याची 23 कोटी रुपयांची रक्कम 15 दिवसांत जमा करावी, असे आदेश प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पंकज रमण यांनी मंगळवारी दिलेत. आरोग्य सेविकांनी प्रोव्हिडन्ट फंड, विमा आणि पेन्शनसाठी प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यानुसार हे आदेश देण्यात आलेत. या आदेशामुळे सेविकांना मोठा दिलासा मिळालाय.

Loading Comments