Advertisement

गोरेगाव-दहिसकर सर्वात बेजबाबदार, मास्क घालण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

मुंबईतील उत्तर भागात राहणारे नागरिक फेस मास्क घालण्याच्या बाबतीत सर्वात जास्त बेजबाबदार आहेत.

गोरेगाव-दहिसकर सर्वात बेजबाबदार, मास्क घालण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
SHARES

सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार मास्क घालण्याचं आवाहन करूनही लोक दुर्लक्ष करत आहेत. पालिका आणि मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील उत्तर भागात राहणारे नागरिक फेस मास्क घालण्याच्या बाबतीत सर्वात जास्त बेजबाबदार आहेत. बहुतेक नागरिक मास्क न घालताच फिरत आहेत. विशेषत: गोरेगाव ते दहिसर दरम्यानच्या नागरिकांचा यात समावेश आहे.

गोरेगाव ते दहिसर म्हणजेच उत्तर, पी / दक्षिण, आर / मध्य, आर / उत्तर व आर / दक्षिण अशा वॉर्ड्सा यात समावेश आहे. या भागात मास्क न घालता फिरत असलेल्या एकूण ५ हजार ७४१ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. तर एकूण १७ हजार ०३७ नागरिकांना दंड ठोठावण्यात आला.

त्यापैकी २ हजार २७९ नागरिक हे उत्तर भागातील आहेत. तर १ हजार ६२९ रुग्ण आर / दक्षिण प्रभागातील आहेत. आकडेवारीनुसार ३० सप्टेंबरपर्यंत महापालिकेनं दंडातून एकूण ५८ लाख ३२ हजार ३०० रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे.

बेजबाबदारीच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागोत तो वॉर्ड सी चा, ज्यामध्ये १ हजार ८७५ नागरिकांना दंड बसला आहे. तर त्यांच्याकडून ५ लाख ८७ हजार ३०० रुपये वसूल केले आहेत. या भागात पायधोनी, मरीन लाईन्स, चिरा बाजार, काळबादेवी आणि भुलेश्वर यासारख्या भागांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासात कोविड १९ चे १४ हजार ३४८ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १४ लाख ३० हजार ८६१ च्या घरात गेला आहे. तर, १६ हजार ८३५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या ११ लाख ३४ हजार ५५५ वर पोहोचली आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारनं यापूर्वी 'मिशन बिगईन अगेन' अंतर्गत कोरोना व्हायरस संबंधित मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) अधिकृत केली होती. त्याअंतर्गत काही नियम शिथिल केले होते. अनलॉक ५.० अंतर्गत आता ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के हॉटेल, रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



हेही वाचा

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' उपक्रमाला जी/उत्तर विभागात चांगला प्रतिसाद

मुंबईच्या झोपडपट्टीत अँटीबॉडीजचं प्रमाण अधिक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा