Advertisement

गोवंडी, शिवाजीनगर कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

मुंबईतील वरळी, प्रभादेवी, धारावी, भायखळापाठोपाठ पूर्व उपनगरात मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत

गोवंडी, शिवाजीनगर कोरोनाचे नवे हॉटस्पॉट
SHARES

मुंबईतील वरळी, प्रभादेवी, धारावी, भायखळापाठोपाठ पूर्व उपनगरात मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या परिसरात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या ठिकाणी दाटीवाटीची झोपडपट्टी वस्ती आहे. त्यामुळं या भागात आतापर्यंत १७५हून अधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

महापालिका करत असलेल्या उपाययोजना आणि नागरिकांकडून पाळला जाणारा सामाजिक वावर यामुळे काही भाग कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असल्याचं चित्र असले, तरी काही भागांत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबधितांची ठिकाणं असलेल्यांमध्ये शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्दचा ६वा क्रमांक लागला आहे. 

एम पूर्व आणि एम पश्चिम या २ विभागांत विभागलेल्या या परिसरांमध्ये मंगळवारी रुग्ण संख्या १७५वर गेली. तर ४००हून अधिक नागरिकांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. शिवाजीनगरमध्ये रफिकनगर, बैंगणवाडी ते लल्लुभाई पार्क मानखुर्दपर्यंतचा हा परिसर दाटीवाटीने वसलेला आहे. 

रफिकनगर हा छोट्या-छोट्या झोपड्यांचा भाग देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जवळपास आहे. आधीच या भागात टीबी, श्वसनाचे विकार व न्युमोनियाचे प्रमाण मोठे असताना या परिसराला करोनाने विळखा घातल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा