Advertisement

रेल्वे, म्हाडा, पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर

दिवाळीच्यानिमित्त रेल्वेसह म्हाडा आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे.

रेल्वे, म्हाडा, पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर
SHARES

दिवाळीच्यानिमित्त दरवर्षी रेल्वेसह म्हाडा आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. यंदाही या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार आहे. देशातील तब्बल ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच वेतन बोनस म्हणून देण्यात येणार आहे. तसंच, म्हाडाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरसकट २० हजार रुपये बोनस देण्याला मान्यता देण्यात आली आहे. त्याशिवाय, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसबाबत बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, कर्मचाऱ्यांच्या या बोनससाठी अर्थसंकल्पात २ हजार २४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

म्हाडा कर्मचाऱ्यांना  बोनस

म्हाडा प्राधिकरणातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीचा आनंद दसऱ्याआधीच मिळाला आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या बुधवारच्या बैठकीत म्हाडाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरसकट २० हजार रुपये बोनस देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट फायदा म्हाडातील सुमारे १७०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तर, यामुळे म्हाडाच्या तिजोरीवर ३ कोटी ४० लाख रुपयांचा भार पडणार आहे.

१७ हजार रुपये

म्हाडा प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत अधिकारी- कामगारांचा बोनस बाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी गेल्या वर्षी म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांना १७ हजार रुपये, तर त्यापूर्वी २०१७ मध्ये १५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा बोनसच्या रकमेत ३ हजार रुपयांची भर पडली आहे.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस

दिवाळीच्या बोनसनिमित्त महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनसरुपी १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. दिवाळी पूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं दिवाळीपूर्वीच बोनस जाहीर करण्यात आला आहेमहापालिकेतील नियमित वेतन श्रेणीतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त हे सानुग्रह अनुदान मिळणार आहेमागील वर्षीही या कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आलं होतं. यंदा विशेष म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोणतही आंदोलन, मागणीशिवाय बोनस जाहीर केल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.हेही वाचा -

आरजे मलिष्का नवरीच्या वेशात रस्त्यांवर का फिरतेय? पाहा धक्कादायक व्हिडिओ

आचारसंहितेआधी म्हाडाची १०० घरांची लाॅटरी?संबंधित विषय