आचारसंहितेआधी म्हाडाची १०० घरांची लाॅटरी?

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण असतानाच म्हाडाच्या कोकण मंडळाने १०० घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात लागणाऱ्या आचारसंहितेवर या सोडतीचा निर्णय घेण्यात येईल.

SHARE

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण असतानाच म्हाडाच्या कोकण मंडळाने १०० घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात लागणाऱ्या आचारसंहितेवर या सोडतीचा निर्णय घेण्यात येईल.

आचारसंहितेत अडकणार?

लोकसभा निवडणुकीआधी म्हाडाच्या मुंबई, नाशिक आणि पुणे मंडळातर्फे लाॅटरी जाहीर करण्यात आली होती. परंतु निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या घरांची सोडत लोकसभेचा निकाल लागल्यानंतर काढण्यात आली होती. यामुळे इच्छुकांना सोडत निघण्यासाठी बरेच दिवस ताटकळत बसावं लागलं होतं. 

निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी ही लॉटरी काढण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीकोनातून जाहिरात काढण्याचीही तयारी म्हाडा कार्यालयात सुरू झाली आहे.

कुठं आहेत घरं?

या १०० घरांमध्ये पालघरमधील ४०, ठाण्याच्या पारसिकमधील २० आणि नवी मुंबईच्या घणसोलीतील ४० तयार घरांचा समावेश आहे. याचसोबत कोकण मंडळातर्फे कल्याणमधील खोणी, उंबार्ली, शिरढोण, कोले आदी भागातही घरे बांधण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.  

गतीमान कारभार

नियोजन प्राधिकरणाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून म्हाडाच्या कारभारात बऱ्यापैकी गती आली आहे. मागील काही महिन्यांमध्ये म्हाडातर्फे ८२ भोगवटा प्रमाणपत्र (OC)चं देण्यात आली आहेत. म्हाडाच्या या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे इमार बांधकामाचे ७०९ अर्ज आले होते. यापैकी ६१५ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ओसीसह उपलब्ध जादा चटईक्षेत्र निर्देशांक, फंजीबलचा वापर आदींचा सवेश आहे.हेही वाचा-

दिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठी सोडत होण्याची शक्यता

'या' बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घरसंबंधित विषय
ताज्या बातम्या