Advertisement

'या' बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर

पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात संक्रमण शिबिरात स्थलांतर झालेल्या या रहिवाशांसाठी म्हाडानं प्रस्तावीत नवीन इमारतीतील घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत जाहीर केली आहे.

'या' बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर
SHARES

ना.. जोशी मार्ग आणि परळ येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच हक्काचं घर मिळणार आहे. पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात संक्रमण शिबिरात स्थलांतर झालेल्या या रहिवाशांसाठी म्हाडानं प्रस्तावीत नवीन इमारतीतील घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत जाहीर केली आहे. सद्यस्थितीत म्हाडानं १४६ पात्र रहिवाशांच्या घरांसाठी करार करून त्यांना संक्रमण शिबिरात पाठवलं आहे.

वेगळा पर्याय

रहिवाशांना कोणत्याही पुनर्वसन प्रकल्पांर्तगत नवीन घरात जाण्याची मोठी उत्सुकता असते. मात्र, काही वर्षे चालणाऱ्या या प्रक्रियेत प्रकल्प रखडल्यास रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं ही बाब लक्षात घेत ना.. जोशी मार्ग आणि परळमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात वेगळा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, या प्रकल्पातील पात्र ठरून संक्रमण शिबिरात स्थलांतरित झालेल्या रहिवाशांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी कराराचा पर्याय स्वीकारण्यात आल्याचं समजतं. त्यामुळं या रहिवांशांची नवीन घरात जाण्याची प्रतिक्षा संपण्याची शक्यता आहे.


संक्रमण गाळ्यात स्थलांतरित

गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत याबाबत चर्चा करत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ३१ ऑक्टोबरपर्यंत या प्रकल्पातील संक्रमण गाळ्यात स्थलांतरित झालेल्या पात्र रहिवाशांना प्रस्तावित नवीन इमारतीत घरं मिळण्यासाठी सरकारनं कराराची रीतसर नोंदणी आणि कम्प्युटराइज्ड सोडतीचा मार्ग स्वीकारला.हेही वाचा -

आचारसंहितेच्या भितीनं पालिकेची तब्बल ३००० कोटींच्या प्रस्तावाला मंजूर

विधानसभा निवडणूक २०१९: निवडणुका ईव्हीएमवरच, मतपत्रिका इतिहासजमासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा