Advertisement

दिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठी सोडत होण्याची शक्यता

दिवाळीनंतर मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांची सोडत होण्याची शक्यता असून, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी बुधवारी संकेत दिले आहेत.

दिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठी सोडत होण्याची शक्यता
SHARES

दिवाळीनंतर मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांची सोडत होण्याची शक्यता असून, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी बुधवारी संकेत दिले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असूनयामध्ये अर्जदारांची कागदपत्रे छाननी करून न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होतेयाबाबत प्रक्रिया सुरू आहे. तसंच, डिसेंबर अखेरीपर्यंत गिरणी कामगारांच्या घरांची सोडत निघण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली.


१७ हजार घरं 

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये बोलताना सामंत यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी उदय सामंत यांनी 'राज्यभरात म्हाडाची १७ हजार घरं जास्त किमतीमुळं पडून होती. विकासकापेक्षा जास्त किंमत आकारली जात असल्यानं, या घरांना ग्राहक मिळत नव्हते. परंतु, आम्ही त्याची किंमत २० ते ४५ टक्क्यांनी कमी केली. त्यानंतर, मुंबई व कोकण वगळता इतर साडेआठ हजार घरांपैकी जवळपास अनेक घरांची विक्री झाली आहे', असं म्हटलं. 


तक्रारींबाबत समिती

म्हाडाच्या वसाहतींमधील वाढीव शुल्काबाबत लोकांची छळवणूक होत असल्याच्या तक्रारींबाबत समिती नेमण्यात आली आहे. तसंच, या तक्रारींबाबतचा अहवाल लवकरच येणार आहे. मात्र, अंतिम निर्णय होईपर्यंत व्याजासहीत सेवाशुल्क आकारण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.



हेही वाचा -

'या' बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर

विधानसभा निवडणूक २०१९: निवडणुका ईव्हीएमवरच, मतपत्रिका इतिहासजमा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा