Advertisement

घरगुती गॅसच्या किंमती वाढणार? 'इतके' पैसे मोजावे लागू शकतात

घरगुती एलपीजी सिलेंडर पुढील काही दिवसांत महागण्याची शक्यता आहे.

घरगुती गॅसच्या किंमती वाढणार? 'इतके' पैसे मोजावे लागू शकतात
SHARES

घरगुती एलपीजी सिलेंडर पुढील काही दिवसांत महागण्याची शक्यता आहे. एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना १००० रुपये मोजावे लागू शकतात. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरवर मिळणारे अनुदानही सरकार रद्द करण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारनं केलेल्या अंतर्गत मूल्यांकनात एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहक १००० पर्यंत पैसे मोजण्यास तयार असल्याचं समोर आलं आहे. पण याबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

सरकार सध्याच्या योजनेत कोणतेही बदल करणार नाही किंवा उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्या सक्षम नसणाऱ्या ग्राहकांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.

सरकारनं आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये अनुदान म्हणून ग्राहकांना ३ हजार ५५९ कोटी रुपये दिले होते. २०१९-२० मध्ये खर्चाचा हा आकडा २४ कोटी ४६८ एवढा होता. म्हणजेच सरकारनं एका वर्षात अनुदानामध्ये सहा पटीनं कपात केली आहे.

सध्याच्या नियमानुसार, तुमचे वार्षिक उत्पन्न जर १० लाखांपेक्षा जास्त आहे. तर तुम्हाला एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची सुविधा मिळणार नाही. मे २०२० मध्ये काही ठिकाणी अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

१ जानेवारीला दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती. आता सिलेंडरची किंमत ८८४ रुपेय ५० पैसे आहे. म्हणजेच जानेवारीपासून आतापर्यंत सिलेंडरच्या किंमतीत १९० रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे.

गेल्या साडे सात वर्षात घरगुती गॅल सिलेंडरची (१४.२ किलो) किंमत दुपटीनं वाढली आहे. मार्च २०१४ ला १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ४१० रुपये ५ पैसे होती, जी आता ८८४ रुपये ५० पैसे आहे.



हेही वाचा

मुंबईत कोविड स्क्रिनिंगसाठी पालिकेनं खर्च केले ९ कोटी

लवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा