Advertisement

लवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट

येत्या काही दिवसात ही मोहिम राबवण्यात येणार आहे.

लवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट
SHARES

विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे. महिलांच्या यशस्वी लसीकरण अभियानानंतर मुंबई महानगरपालिका आता फक्त विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवणार आहे. येत्या काही दिवसात ही मोहिम राबवण्यात येणार आहे.

मुंबईत येत्या आठवड्याभरात ही विशेष लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. यात 18 वर्षावरील बहुतांश विद्यार्थ्यांचं लसीकरण केले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना फक्त त्यांचं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. त्यानंतर त्यांना लस घेता येईल.

मुंबईत १२०० हून अधिक महाविद्यालये आहेत. त्यात ७ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील साधारणत: ३ लाख विद्यार्थी १८ वर्षावरील आहेत. त्यातील अर्ध्या विद्यार्थ्यांनी लस घेतली असण्याची शक्यता आहे.

तर इतर लसीकरणाचा टक्का तुलनेनं कमी आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबवून हा टक्का वाढवण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. दरम्यान आतापर्यंत परदेशी जाणाऱ्या २८ हजार ९०३ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२० पासून करण्यात येत असलेल्या या वैद्यकीय चाचण्यांनी नुकताच एक कोटींचा टप्पा पार केला आहे. यानुसार २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ५९ हजार २५४ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात आज दिवसभरात ४ हजार २८५ जण करोनामुक्त झाले. आजपर्यंत राज्यात ६३ लाख ४९ हजार ०२९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात ३ हजार ६०८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ४८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

राज्यात आज रोजी एकूण ३९ हजार ९८४ करोना बाधित रुग्ण आहेत. तर राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ३१ हजार २३७ झाली आहे.हेही वाचा

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत

एसटीचे ८५००हून अधिक कर्मचारी कोरोनामुक्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा