Advertisement

मुंबईत कोविड स्क्रिनिंगसाठी पालिकेनं खर्च केले ९ कोटी

बुधवार, २२ सप्टेंबर रोजी, प्रशासनानं यासंदर्भातील एक प्रस्ताव मंजूर केला.

मुंबईत कोविड स्क्रिनिंगसाठी पालिकेनं खर्च केले ९ कोटी
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, प्रशासनानं रेल्वे स्थानकं, विमानतळ आणि कोविड केअर सेंटरवर तैनात खाजगी सुरक्षा रक्षकांवर ९ कोटी रुपये खर्च केले आहेत. बुधवार, २२ सप्टेंबर रोजी, प्रशासनानं यासंदर्भातील एक प्रस्ताव मंजूर केला.

प्रस्तावानुसार, नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यान, पालिका लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, दादर आणि वांद्रे सारख्या रेल्वे स्थानकांवर बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत होती.

विविध ठिकाणी १५० सुरक्षा रक्षक तैनात होते. शिवाय, ३० सप्टेंबरपर्यंत ही सुरक्षा सेवा सुरू राहतील असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. पालिकेनं आतापर्यंत ७ कोटी रुपये आधीच दिले आहेत आणि उर्वरित २ कोटी रुपये आता देणार आहे.

रेल्वे स्थानकांव्यतिरिक्त, सहार विमानतळ, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स कोविड सेंटर, दहिसर ऑक्ट्रोई नाका कोविड सेंटर आणि दहिसर कंडरपाडा कोविड सेंटर इथं जानेवारी २०२० पासून गार्ड तैनात होते.

साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून, मुंबई कोरोनाव्हायरससाठी हॉटस्पॉट होते. कोविड -१९ च्या प्रभावाला आळा घालण्यासाठी, पालिकेनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हटलं होतं की, या संकटावर मात करण्यासाठी त्यानं गेल्या सात महिन्यांत १ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे.

शिवाय, गेल्या वर्षी, जेव्हा कोविड -१९ संकट शिगेला पोहोचले होते. तेव्हा एकूण १.२० लाख पालिका कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९० हजार कर्मचारी मैदानात होते. भत्ता प्रोत्साहन म्हणून आरोग्य आणि इतर विभागांचे कर्मचारी, अधिकारी, परिचारिका आणि डॉक्टरांना प्रतिदिन ३०० रुपये देण्यात आले.

स्थायी समितीसमोर सादर केलेल्या अहवालानुसार, जून ते डिसेंबर, २०२० या सात महिन्यांच्या कालावधीत ९० हजार पालिका कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर पालिकेनं एकूण ३८३.८७.87 कोटी रुपये खर्च केले आहेत.

यापूर्वी, पालिकेनं खुलासा केला होता की, त्यानं कोरोनाव्हायरस रूग्णांचे मृतदेह हाताळण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी १०.९९ कोटी रुपये खर्च केले होते.



हेही वाचा

लवकरच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम, फक्त असेल 'ही' अट

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा