Advertisement

ट्विटरला पर्याय आहे 'हा' स्वदेशी अॅप, मंत्रालयानं दिली मंजुरी

मोदी सरकार आता ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटविरोधात कडक धोरण अवलंबणार आहे.

ट्विटरला पर्याय आहे 'हा' स्वदेशी अॅप, मंत्रालयानं दिली मंजुरी
SHARES

मोदी सरकार आता ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटविरोधात कडक धोरण अवलंबणार आहे. कारण केंद्र सरकारनं इशारा देऊनही देशविरोधी प्रचार करणारी आणि प्रक्षोभक मजकूर प्रसारित करणारी ट्विटर हँडल्स Twitter नं हटवली नाहीत.

आता मोदी सरकारनं ट्विटरला पर्याय म्हणून स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग अॅपचा प्रसार सुरू केला आहे. Koo नावाच्या या made in India मोबाईल अॅप्लिकेशन मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आयटी मंत्रायानं स्वतःचं व्हेरिफाइड अकाउंट उघडलं आहेच.

शिवाय MyGov, Digital India, India Post, NIC, NIELIT, SAMEER, कॉमन सर्विसेज सेंटर, UMANG, डिजी लॉकर, NIXI, STPI, CDAC आणि CMET या सरकारी, निमसरकारी संस्थांचीसुद्धा अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स Koo वर दिसू लागली आहेत.

काय आहे Koo?

Koo हे अ‍ॅप अगदी ट्विटरसारखंच आहे. यामध्ये गोष्टी पोस्ट केल्या जाऊ शकतात. तसंच फोटो आणि व्हिडिओही जोडता येतात. इतर पोस्टवर कमेंट्स सोबत तुम्ही त्यांना फॉलोही करू शकता. यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि मजकूर असे तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

गुरुवारी सरकारनं ट्विटरला (Twitter) नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये सरकारनं मायक्रोब्लॉगिंग साईट ट्वीटरला १ हजार १७८ काऊंट्स ब्लॉक करण्यास सांगितलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या सर्व ट्वीटर अकाऊंटचा संबंध खलिस्तान किंवा पाकिस्तानशी आहे.

याआधी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ट्वीटरला आदेश दिले होते की, ३० जानेवारीला चुकीचे, धमकावणारे आणि चिथवणारे ट्वीट टाकणारे २५७ अकाऊंट बंद करा, जे ट्विटमध्ये हॅशटॅगसोबत चिथवणारे संदेश पोस्ट करत होते. पण ट्विटरनं सरकारच्या या मागणीवर अद्याप प्रतिसाद दिला नाही.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा