Advertisement

पहिल्या पावसात दाणादाण! शहरात 'इतक्या' दुर्घटना घडल्या

शहरात 49.6 मिमि एवढ्या पावसाची नोंद झाली असून 8 ठिकाणी पाणी तुंबल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तर 70 ठिकाणी झाडे पडल्याची व 9 ठिकाणी शाँर्ट सर्किट झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

पहिल्या पावसात दाणादाण! शहरात 'इतक्या' दुर्घटना घडल्या
SHARES
मुंबईत पडणारा पाऊस हा दरवर्षी पालिकेसह मुंबईकरांची परीक्षा घेत असतो. मुंबईवर आलेले निसर्ग चक्रीवादळ पुढे निघून गेल्यानंतर शहरात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार शहरात गुरूवारी पडलेल्या पावसाने शहरात मोठी नैसर्गिक हानी केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 49.6 मिमि एवढ्या पावसाची नोंद झाली असून 8 ठिकाणी पाणी तुंबल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तर 70 ठिकाणी झाडे पडल्याची व 9 ठिकाणी शाँर्ट सर्किट झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई शहराची पहिल्याच पावसाने दुर्दशा केली आहे. सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. सायन, किंग सर्कल, हिंदमाता, दादर टिटि, षन्मुखानंद हाँल, अँण्टाँप हिल, एसआयएस काँलेज मुलुंड, मानखुर्द रेल्वे स्टेशन अशा 9 ठिकाणी पाणी तुंबलेे होते. शीव पोलीस ठाण्याच्या दारातच गुडघाभर पाणी साठलं आणि मान्सूनची महापालिकेची तयारी उघडी पडली. पावसाचे पाणी साचल्याने मुंबईकरांची एकच त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला होता. शीव रोड क्रमांक २४ व गांधी मार्केटच्या ठिकाणी पाणी असल्याने बेस्ट बसेसचा मार्ग इतर रस्त्याने वळवण्यात आला. त्यानंतर येथील पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

तर शहरात 6 ठिकाणी दुर्घटना घडल्या असून त्यात घराच्या भिंती आणि सुरक्षा भिॆत पडल्याच्या तक्रारी आहेत. त्याच मुसळधार पावसात 70 ठिकाणी झाडे पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात शहरात 29, पूर्व उपनगरात 21, पश्चिम उपनगरात 20 झाडं पडल्याची नोंद करण्यात आली आहे. पावळ्यात शहरात अनेक ठिकाणा शाँर्ट सर्किटच्या ही घटना घडत असतात, गुरूवारी मुंबईत 9 ठिकाणी शाँर्ट सक्रिटच्या घटना घडल्या असून त्यात शहरात 7 तर पश्चिम उपनगरात 2 घटना घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. माञ सुदैवाने या सर्व नैसर्गिक दुर्घटनेत कोणती ही जिवीत हानी झालेली नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा