Advertisement

गावातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला बंदी, पुण्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा निर्णय

पुण्यातील या ग्रामपंचायतीतील नागरिकांकडून गावातील सुपरमार्केटमध्ये दारू विरण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे.

गावातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला बंदी, पुण्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा निर्णय
SHARES

महाविकास आघाडी सरकाराच्या (Mahavikas Aghadi Government) सुपर मार्केटमध्ये (supermarket) वाईनच्या (wine) विक्रीच्या धोरणाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव पुण्यातील या ग्रामपंचायतीतील नागरिकांकडून विरोध होता आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव ग्राम पंचायतीनेही आता गावातील किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व ग्रामस्थांनी एक मतांनं हा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पारगाव इथं ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही. गेल्या अनेकवर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं नुकत्याच घेतलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या धोरणाला ग्रामस्थांनी विरोध करत आपला निषेध नोंदवलं आहे.

जवळपास १६ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात अद्याप एकही दारुचं दुकान नाही. तसंच ग्रामपंचायतीनंही कोणत्याही प्रकारची परवानगी या प्रकारच्या दुकानांसाठी दिलेली नाही. कोणत्याही प्रकाराच्या निवडणुकीत मतांसाठी दारूचा वापर केलेला नाही.हेही वाचा

पुण्यात रेल्वे तिकिट दरात कपात, 'हे' आहेत नवे दर

वाइन विक्रीला अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा विरोध

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा