Advertisement

पुण्यात रेल्वे तिकिट दरात कपात, 'हे' आहेत नवे दर

पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

पुण्यात रेल्वे तिकिट दरात कपात, 'हे' आहेत नवे दर
SHARES

पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोना महामारीच्या सुरूवातीच्या काळात वाढवण्यात आलेले पुणे रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर आजपासून पुन्हा एकदा दहा रुपये करण्यात आले आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांची सामान्य विक्री पुन्हा सुरू झाली आहे. आजपासून (१ फेब्रुवारी) प्लॅटफॉर्म तिकीट प्रति व्यक्ती १० रुपये या दरानं उपलब्ध होणार आहे. कोरोना महामारीमुळे रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी या तिकीटाची किंमत वाढवून ५० रुपये करण्यात आली होती.

मात्र आता कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत असल्यानं आणि शहरातील कोविड स्थितीचा आढावा घेऊन पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पूर्ववत करण्यात आल्याचे दिसत आहे.

रेल्वेस्थानकांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे या उद्देशानं तिकीट दर वाढवले गेल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. तर, वृद्ध, दिव्यांग, रूग्ण, गरोदर आदींसह मदतीची आवश्यकता असणाऱ्यांनाच प्लॅटफॉर्म तिकीट दिले जात होते.



हेही वाचा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं 'शिवशाही'चा प्रवास ठरतोय असुरक्षित?

रेल्वे स्थानकांतील पाणी देणारी 'ही' सुविधा अद्याप बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा