Advertisement

वाइन विक्रीला अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा विरोध

किराणा दुकाने व सुपर मार्केटमध्ये वाइनविक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) विरोध केला आहे.

वाइन विक्रीला अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा विरोध
SHARES

किराणा दुकाने व सुपर मार्केटमध्ये वाइनविक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) विरोध केला आहे. महासंघाच्या मुंबई महानगर युनिटमधील व्यापाऱ्यांनी अशी वाइन विक्री करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

'कॅट' ही देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. देशभरात संघटनेचे ५ कोटींहून अधिक सदस्य असून, मुंबई महानगर क्षेत्रात ४ लाखांहून अधिक व्यापारी संघटनेशी संलग्नित आहेत. त्यामध्ये घाऊक व किरकोळ, अशा दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

संघटनेशी संबंधित घाऊक व्यापारी वाइनचा किरकोळ किराणा विक्रेत्यांना पुरवठा करणार नाहीत. त्यामुळं ही वाइन सर्वसामान्य दुकानात विक्री होणार नाही, अशी 'कॅट'ची भूमिका आहे. हा निर्णय राज्यातील तरुणपिढीला व्यसनाधीन करण्यासाठी घेतल्याचं 'कॅट' मुंबईचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी म्हटलं.

राज्य मंत्रिमंडळाने वाईन विक्रीबाबत काही दिवसांपूर्वी निर्णय जाहीर केला होता. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार आहे. मात्र, १ हजार चौरस फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकणार आहे.

राज्य सरकारने राज्यात नवे वाईन धोरण राबवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने आता वाईन सुपरमार्केटमध्ये विकण्यास परवानगी दिली आहे. २०२३ पर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. यासाठीच राज्य मंत्रिमंडळाने आजचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आजच्या घडीला वर्षाला ७० लाख लिटरची वाईनती विक्री होत आहे. आता सरकारने वाईन विक्रीला चालना देण्याचे पाऊल उचलल्यानंतर आकडा १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा