Advertisement

ग्रँट रोड आणि वांद्रे स्थानकातील पूल बंद

पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड आणि वांद्रे स्थानकातील पूल बंद करण्यात येणार आहेत.

ग्रँट रोड आणि वांद्रे स्थानकातील पूल बंद
SHARES

पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड स्थानकातील मौलाना शौकत अली रोडवरील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. आयआयटी मुंबई, महापालिका आणि रेल्वे यांच्या संयुक्त समितीनं पुलांची पाहणी केली होती. या समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी नुकतीच रेल्वे आणि महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत हा पूल तातडीनं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहनांसाठी बंद

ग्रँट रोड स्थानकातील मौलाना शौकत अली रोडवरील रोड ओव्हर ब्रिज वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्यानं प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसंच, वांद्रे स्थानकातील मध्यभागी असलेल्या पूलाच्या पूर्वेकडील पायऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहेत.


दुरुस्तीचं काम

वांद्रे स्थानकातील पादचारी पूलाच्या पायऱ्यांचं दुरुस्तीचं काम १८ सप्टेंबर ते १६ नोव्हेबर या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.हेही वाचा -

संजय जाधवच्या सिनेमात कतरीना कैफ!Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा