अती झाले अतिक्रमण..

 Grant Road
अती झाले अतिक्रमण..
अती झाले अतिक्रमण..
अती झाले अतिक्रमण..
अती झाले अतिक्रमण..
अती झाले अतिक्रमण..
See all

ग्रँटरोड - ग्रँटरोड रेल्वे स्टेशनवर सध्या सर्वत्र फेरीवाल्यांचा विळखा पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पानाचे स्टॉल, कपड्यांची दुकानं यांनी फुटपाथवरच बस्तान मांडलंय. स्टेशनच्या ब्रिजवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. मात्र या ब्रिजवरही फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या दुकानं थाटत प्रवाशांच्या नाकी नऊ आणलेत. एवढं कमी होतं म्हणून की काय, अनेक बेघरांनीही तिथेच आसरा घेत संसार थाटला आहे. त्यामुळे स्टेशन परिसर प्रवाशांसाठी की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न या स्टेशनवरून प्रवास करणा-या लाखो मुंबईकरांना पडला आहे. यासंदर्भात बोलताना अनेकदा तक्रार देऊनही रेल्वे पोलीस कारवाई करत नसल्याचं इथल्या नियमित प्रवासी निलिमा काळे यांनी सांगितले.

Loading Comments