Advertisement

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'या' आहेत गाईडलाईन्स

याही वर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'या' आहेत गाईडलाईन्स
SHARES

येत्या ६ डिसेंबर रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य शासनाने मज्जाव केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्माण (Mahaparinirvan Din) दिनानिमित्त चैत्यभूमीवर कार्यक्रम होतात.  

पण याही वर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर (Corona) सरकारनं कोणतेही कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे. सभा, संमेलने, मोर्चा काढण्यासदेखील राज्य शासनानं मनाई केली आहे. या वर्षीचा महापरिनिर्माण दिन अनुयायांनी अत्यंत साधेपणानं करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

राज्य सरकारनं ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, दादर इथल्या चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल लावण्यात येणार नाहीत, असं जाहीर केलं आहे.

अनुयायांनी घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं, असंही आवाहन राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

राज्य शासनानं जारी केलेल्या सुचनांनुसार, चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक आहे. लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पॉार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्राम स्थळ होते. तेथेच त्यांची समाधीदेखील आहे. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी असून देशभरात हा महापरिनिर्माण दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा हा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे.



हेही वाचा

आफ्रिकेतून आलेल्या ४६६ प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, तरीही

राज्यात ९० लाखांहून अधिक जणांनी चुकवला दुसरा डोस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा