Advertisement

गुमास्ता कामगारांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद


गुमास्ता कामगारांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद
SHARES

सीएसटी - पगार वाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुमास्ता कामगारांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
या संपाचा दक्षिण मुंबईतीळ कपडा मार्केटवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसले. नेहमीप्रमाणे मार्केटमध्ये ग्राहकांची खरेदी सुरू आहे. व्यापारी मालक मात्र कामगारांची ही मागणी अवाजवी असल्याचे सांगत आहेत. कामगारांनी आमच्याशी बसून चर्चा करावी. संप पुकारल्यामुळे धंद्यावर कोणताच फरक पडला नाही. आम्ही करार केल्याप्रमाणे त्यांचा पगार देत असल्याचे व्यापारी मालक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र वोरानी यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा