Advertisement

कोरोनामुळं व्यायामशाळेकडं सभासदांची पाठ

सध्या १० ते १५ टक्के ग्राहकच व्यायामशाळेत येत आहेत. त्यामुळं व्यायामशाळा चालक आणि प्रशिक्षक संकटात सापडले आहेत.

कोरोनामुळं व्यायामशाळेकडं सभासदांची पाठ
SHARES

लॉकडाऊनमुळं (lockdown) बंद असलेल्या मुंबईतील व्यायामशाळा (gym) आता सुरू झाल्या आहेत. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी सरकारनं दिली. कोरोनापासून (coronavirus) संरक्षणासाठी व्यायामशाळेत सर्व खबरदारी घेतली जात आहे. सामाजिक अंतर पाळण्यासाठी सदस्यांना व्यायाम करताना शारीरिक आधार देण्याऐवजी प्रशिक्षक फक्त तोंडी सूचना देत आहेत. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळं नियमित सभासदांनी व्यायामशाळांकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या १० ते १५ टक्के ग्राहकच व्यायामशाळेत येत आहेत. त्यामुळं व्यायामशाळा चालक आणि प्रशिक्षक (jym owner and trainer) संकटात सापडले आहेत. कोरोनापासून संरक्षणासाठी व्यायामशाळा चालकांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये जागोजागी मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत.

सामाजिक अंतराच्या (social distance) पालनासाठी मर्यादित व्यक्तींना प्रवेश, प्रशिक्षकांसाठी हॅण्ड ग्लोव्ह्ज, मास्क आदींची खरेदी, व्यायामशाळेत सॅनिटायझर, त्याचबरोबर व्यायामशाळेच्या निर्जंतुकीकरणासाठी फॉग मशीन आदींची व्यवस्था केली आहे.

कोरोनापासून सावध राहण्यासाठी सर्व तयारी व्यायामशाळेनं केली असली तरी सभासदांनी (bodybuilding) पाठ फिरवली आहे. अनेक जणांनी कोरोनाची लागण होण्याच्या भीतीनं जानेवारीपर्यंत व्यायामशाळेत व्यायामासाठी येणार नसल्याचं सांगितलं. लॉकडाऊनपूर्वी दरदिवशी अनेकजण व्यायामासाठी जात होते. परंतू, सध्या १० व्यक्तीच येत आहेत. हेही वाचा -

Mumbai Temperature: मुंबईच्या तापमानात अधिक वाढ

इतर वाहतुकीपेक्षा विमानप्रवास सुरक्षित


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा