Advertisement

इतर वाहतुकीपेक्षा विमानप्रवास सुरक्षित

या सर्व वाहतूक सेवेमध्ये विमानप्रवास सुरक्षित असल्याचं मत प्रवाशांनी व्यक्त केल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

इतर वाहतुकीपेक्षा विमानप्रवास सुरक्षित
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळं मुंबईतील सर्व वाहतूक सेवा (mumbai transport) बंद करण्यात आली होती. पंरतू, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना व चाकरमान्यांची सार्वजनिक वाहतूक (public transport) सेवा उपलब्ध नसल्यामुळं होणारी गैरसोय लक्षात घेता मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, विमान व लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. सुरूवातील केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीचं ही सेवा सुरू करण्यात आली. परंतू, या सर्व वाहतूक सेवेमध्ये विमानप्रवास (air travel) सुरक्षित असल्याचं मत प्रवाशांनी व्यक्त केल्याची माहिती एका सर्वेक्षणातून (research) समोर आली आहे.

बस, रेल्वेपेक्षाही विमानप्रवास सुरक्षित असल्याचं मत ९९ टक्के प्रवाशांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून (international airport) या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. देशभरात लॉकडाऊन हळूहळू शिथिल होताच अनेकांनी कामानिमित्त रेल्वे, बस आणि विमानप्रवास सुरू केला. विमान प्रवासातही लक्षणीय वाढ होऊ लागली.

यात व्यवसायानिमित्त आणि विश्रांतीसाठी पर्यटनाला जाणाऱ्यांचाही समावेश होता. कोरोनाकाळात प्रवासादरम्यान दिलेल्या निकषांचं पालन करत विमानप्रवास सुरळीत होऊ लागला. गोवा, केरळ, उत्तराखंडसारख्या राज्यांनी तर आपल्या सीमा पर्यटनासाठी खुल्या केल्या असून, कमीत कमी र्निबध घातले. तसंच, कोविड चाचणी किंवा नोंदणीशिवाय ही राज्य प्रवासी स्वीकारत असल्यानं येत्या महिन्यात ६१ टक्के प्रवाशांनी विश्रांती व व्यवसायाच्या निमित्तानं पुन्हा विमानप्रवासाची तयारी दर्शवली आहे. सुरक्षित प्रवास असल्यानं सप्टेंबर महिन्यात प्रवास केलेल्या ८४ टक्के प्रवाशांनी या प्रवासाबाबत अधिक विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून मत व्यक्त केलं आहे.

९९ टक्के  प्रवाशांनी बस, रेल्वेपेक्षा विमानप्रवासाला अधिक पसंती दिली आहे, तर ९९.९० टक्के  प्रवाशांनी पुन्हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. चांगल्या सुरक्षित तपासणीसाठी ७९.९० टक्के  प्रवाशांनी आणि बॅगेज ड्रॉपसाठी ७५ टक्के प्रवाशांनी मानांकन श्रेणी दिली आहे. विमानतळावर खरेदी, खाद्यपदार्थ सेवा, प्रवासादरम्यान जेवणाची व्यवस्था आदींबद्दलही समाधान व्यक्त केले आहे.हेही वाचा -

मुंबईच्या सूर्यकुमार यादवची तुफान फलंदाजी; झालेल्या पराभवाची केली परतफेड

राज्यात ८४३० नवे रुग्ण, ९१ जणांचा दिवसभरात मृत्यू


Read this story in हिंदी
संबंधित विषय