Advertisement

mumbai temperature: मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ

मागील आठवडाभरात तापमानातील वाढ सातत्यानं टिकून असून, पुढील २ ते ३ दिवस चढ्या तापमानाचे असण्याची शक्यता आहे.

mumbai temperature: मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ
SHARES

ऑक्टोबर महिना संपत आला तरी मुंबईकरांना अद्याप उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पूर्ण होत असताना मुंबई  शहर आणि उपनगरातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. मागील आठवडाभरात तापमानातील वाढ सातत्यानं टिकून असून, पुढील २ ते ३ दिवस चढ्या तापमानाचे असण्याची शक्यता आहे. 

मागील काही दिवसांपूर्वी मुंबईत पहाटे थंडीचं वातावरण निर्माण झालं होतं. थंडीची चाहुल लागल्यानं मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, असं असलं तरी पहाटे थंडी, सकाळी ढगाळ वातावरण व संध्याकाळी उकाडा या वातावरणामुळं मुंबईकरांच्या तब्येतीत बिघाड होत आहेत. 

पावसाच्या परतीच्या प्रवासामुळं वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून उत्तरेकडं आहे. त्याचवेळी आद्रतेचं प्रमाणदेखील अद्याप कमी झालं नाही. पावसाचा परतीचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण कमी होण्यास काही कालावधी अपेक्षित असल्याचं हवामान विभागाच्या अंदाज आहे.

कमाल आणि किमान तापमानात सध्या सुमारे १० अंशाचा फरक आहे. मागील आठवड्यात पाऊस थांबल्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमानात एकदम वाढ झाली आहे.



हेही वाचा -

इतर वाहतुकीपेक्षा विमानप्रवास सुरक्षित

Coronavirus Updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा