Advertisement

hair cutting salon: आता ग्राहकांची हजामत! हेअर कटींगचे दर वाढले

सलूनमध्ये जाताना अधिकची रक्कम सोबत ठेवा. कारण सलून चालक नव्या दराने पैसे वसूल करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने पुन्हा एकदा दरवाढ केल्यामुळे आता ग्राहकांची हजामत होणार आहे.

hair cutting salon: आता ग्राहकांची हजामत! हेअर कटींगचे दर वाढले
SHARES

येत्या रविवार २८ जूनपासून राज्यभरातील सलून तब्बल ३ महिन्यानंतर सुरू होत आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात केसांचं जंगल झालेल्यांची पावलं सकाळी सकाळी सलूनची वाट चालू लागतील. परंतु सलूनमध्ये जाताना अधिकची रक्कम सोबत ठेवा. कारण सलून चालक नव्या दराने पैसे वसूल करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने पुन्हा एकदा दरवाढ (hair cutting salon rate hike in maharashtra during lockdown ) केल्यामुळे आता ग्राहकांची हजामत होणार आहे. 

लाॅकडाऊनच्या काळात सलून बंद असूनही महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने १ जूनपासून दाढी-कटींगच्या दरांत २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हेअर कटींगसाठी १०० रुपये आणि दाढीसाठी ७० रुपये झाले होते. मात्र ही दरवाढ होऊन २५ दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार रविवारपासून ग्राहकांना हेकर कटींगसाठी १५० रुपये, तर हेअर डायसाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या सलूनमध्ये दाढी करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने दाढीचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. 

हेही वाचा - Salons Open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सलून सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली असून सलून व्यावसायिकांना त्याचं तंतोतंत पालन करावं लागणार आहे. २८ जूनपासून सलून व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असली, तरी तिथं फक्त केस कापण्यासाठीच परवानगी असेल. दाढी करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

सरकारच्या परिपत्रकानुसार मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलून्स आणि ब्युटी पार्लस २८ जून २०२० पासून सुरु करता येतील. राज्यातील उर्वरित भागांमध्येसुद्धा केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लगेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणं आवश्यक आहे.

• केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येईल. त्वचेशी संबंधित इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल

• दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणं बंधनकारक राहील

• ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करावी लागेल. अशा दुकानांतील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइज करणं गरजेचं आहे.

• फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणं शक्य नाही अशा वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज करावी लागेल.

• उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.

त्याचसोबतच केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. सलूनमध्ये गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे. थोडे दिवस निरीक्षण केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.  

हेही वाचा - मुंबईतील हा अवलिया चालवतोय 'सलून वाचनालय'

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा