हनुमान जयंतीनिमित्त वडाळा येथील प्रसिद्ध 150 वर्ष जुन्या हनुमान मंदिरात मंगळवारी भाविकांची गर्दी जमली होती. 150 वर्ष जुने असलेल्या या मंदिरातील हनुमानाची मूर्ती स्वयंभू आहे. ती लाल शेंदुराने माखलेली आहे. प्राचिन काळापासून या मूर्तीचे अस्तिस्त्व आहे. ही स्वयंभू मूर्ती एकाच जागेवर असल्याने तिला 'अलबेला हनुमान' असं नाव देण्यात आले.
वडाळा कात्रक रोडवर असणाऱ्या या मंदिरात हनुमान जयंतीस भाविक लांबचे अंतर गाठून दर्शनासाठी येतात. तर, हनुमान जयंती म्हणून नाही, तर दर शनिवारीही भाविक आवर्जून या मंदिरात येतात, असे विसर दुबे (मंदिराचे कार्यकारी सदस्य) यांनी सांगितले.
विशेष म्हणजे वडाळ्यातील प्रसिद्ध राम मंदिर आणि हनुमान मंदिर सामोरा-समोर असल्याने भाविकांची गर्दी सणाच्या निमित्ताने मंगळवारी पाहायला मिळाली. हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही मंगळवारी संध्याकाळी भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम मंदिरातर्फे ठेवण्यात आला आहे.