Advertisement

हार्बर मार्गावर 20 लोकल फेऱ्या वाढणार

अतिरिक्त फेऱ्या सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हार्बर मार्गावर 20 लोकल फेऱ्या वाढणार
SHARES

नेरूळ-उरण या नव्या मार्गावर प्रवाशांची संख्या गेल्या काही महिन्यात लक्षणीय वाढली आहे. या वाढत्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हार्बर मार्गावरील नेरूळ-उरण मार्गावर ऑक्टोबर 2025 पासून 20 नव्या लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत.

नेरूळ-उरण लोकलमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे या मार्गावर लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती.

रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या मार्गावर आता लोकलच्या 20 अतिरिक्त फेऱ्या वाढवण्याण्यात येणार आहे. या फेऱ्या ऑक्टोबर 2025 च्या नव्या वेळापत्रकात समाविष्ट केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मध्य रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गाच्या तुलनेत नेरूळ-उरण मार्गावर प्रवासी संख्या कमी आहे. यामुळे या मार्गावर एक ते दीड तासाच्या फरकाने लोकल धावते. या मार्गावर सध्या दिवसभरात 40 फेऱ्या धावतात, यात नेरुळ-उरण दरम्यान 20 आणि उरण-बेलापूर दरम्यान 20 फेऱ्यांचा समावेश आहे.

परंतु आता आता 20 फेऱ्या वाढवल्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या 60 पर्यंत पोहोचणार आहे. यामुळे अप मार्गावर 30 आणि डाउन मार्गावर 30 फेऱ्या चालवल्या जातील. लोकलची संख्या वाढवल्यामुळे दोन गाड्यांमधील अंतर देखील कमी होणार आहे. तसेच गरज पडल्यास फेऱ्या आणखी वाढवण्यात येतील, असे देखील रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



हेही वाचा

नवी मुंबई विमानतळावरून एअर इंडियाची 20 उड्डाणे उडणार

मुंबई मेट्रो: यावर्षी 5 नवीन मार्ग सुरू होण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा