Advertisement

सांताक्रुझच्या पश्चिमेच्या त्या फेरीवाल्यांवर कारवाई, पदपथ झाले मोकळे


सांताक्रुझच्या पश्चिमेच्या त्या फेरीवाल्यांवर कारवाई, पदपथ झाले मोकळे
SHARES

सांताक्रुझ पश्चिम भागातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई हाती घेऊन रेल्वे स्थानकाच्या परिसरातील सुमारे दीडशेहून अधिक फेरीवाले तसेच वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

150 जणांवर झाली कारवाई

सांताक्रुझ पश्चिम रेल्व स्थानकापरिसर तसेच येथील टिळक रोड,  एम.जी.रोड आणि कानुभाई देसाई मार्गावरील सुमारे 40 स्टॉल्स आणि पदपदपथावरील वाढीव 150 बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पदपथावरील या स्टॉल्ससह वाढीव बांधकामे तोडण्यात आल्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ पादचाऱ्यांना तसेच रेल्वे प्रवाशांना चालण्यास मोकळ्या झाल्या आहेत.


सर्व विभागांची संयुक्त कारवाई

महापालिका एच-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका देखभाल विभाग व परवाना विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.  72 कामगारांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एक जेसीबी आणि सहा ट्रकचा वापर करण्यात आला.  दुय्यम अभियंता प्रमोद भोसले, वरिष्ठ परवाना निरिक्षक गरतुला, परमार तसेच देखाभाल विभागाचे सहायक अभियंता सय्यद आदींच्या पथकाने ही कारवाई केली,असल्याचे शरद उघडे यांनी स्पष्ट केले.


वांद्रयातील नर्गिस दत्त झोपडपट्टीवरही कारवाई

वांद्रे पश्चिम येथील नर्गिस दत्त झोपडपट्टी आणि रंगशारदा नाट्यगृहाच्या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे. नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीतील सुमारे ४० अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करून या झोपड्या जमिनदोस्त करण्यात आल्याची माहिती एच –पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा