विठ्ठल मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

 wadala
विठ्ठल मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन
विठ्ठल मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन
विठ्ठल मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन
See all
wadala, Mumbai  -  

वडाळा - येथील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिराचा यंदा 400 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन विठ्ठल मंदिरात करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब, त्वचारोग, बालरोग, स्त्रीरोग तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी या शिबिरात करण्यात आली.

पंचकर्म आणि आयुर्वेदिक या दवाखान्यातील डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली. सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिराचा 250 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये मधुमेह आणि रक्तदाब तपासणीचे अधिक प्रमाण होते. सामाजिक कार्यकर्ते नरसिंह ठाकूर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. 9 एप्रिलपर्यंत असे विविध कार्यक्रम सुरु राहणार आहेत.

Loading Comments